पंढरपूर बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाला पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. त्यानंतर मराठा समाजाल पुन्हा आरक्षण देण्यासाठी एका ब्राम्हणाला जन्म घ्यावा लागला असं वादग्रस्त विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. निवडणूकीच्या तोंडावर जानकरांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा राजकिय वातावरण तापले आहे.
माढा तालुक्यातील अरण येथे झालेल्या सावता परिषदेत बोलताना महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केले. मराठा समजाला दिलेलं आरक्षण हे मी माझं कर्तव्य म्हणून पार पाडले. असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर जानकरांनी हे विधान केल्याने मात्र आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
मराठा समाजातील केवळ २ टक्के लोक श्रीमंत आहेत. त्या समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या कोट्याला फटका बसणार आहे. हा चुकीचा प्रसार काही जण करत आहेत. असंही ते म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले असल्याचे सांगत यासाठी जगातील सर्वात महाग वकील नेमला. तो दर तासाला दोन कोटी रुपये घेतो. असे जानकर यांनी सांगितले.