मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जगातील बलाढ्य टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने Internet Explorer ही वेब ब्राऊजर सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या ब्लॉगमधून ही माहिती देण्यात आली आहे. विंडोज 95 सोबत या वेब ब्राऊजरची सेवा सुरु करण्यात आली होती. गेली 25 वर्षे अविरतपणे सेवा देणारे हे वेब ब्राऊजर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील काही वर्षांपासून मायक्रोसॉफ्टने विंडोज युजर्सना Internet Explorer वरुन Edge Browser वर शिफ्ट होण्यासाठी वेळ दिला होता. आता Internet Explorer 15 जून 2022 पासून निवृत्त होत असल्याची अधिकृत घोषणा कंपनीने केली आहे. मायक्रोसॉफ्ट एज् चे प्रबंधक सीन लिंडर्से यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, Internet Explorer डेस्कटॉप 11 आणि विंडोज 10 च्या काही प्रकारामधून 15 जून 2022 पासून बंद होईल.
The future of Internet Explorer on Windows 10 is in Microsoft Edge—the Internet Explorer 11 desktop application will be retired on June 15, 2022 https://t.co/o1vj2Hxksb pic.twitter.com/22ReVYyw3G
— Windows Blogs (@windowsblog) May 19, 2021
विंडोज् 10 वरील Internet Explorer ची जागा आता मायक्रोसॉफ्ट एज् घेणार आहे. मायक्रोसॉफ्ट एज् हे Internet Explorer च्या तुलनेमध्ये अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक आधुनिक आहे. याशिवाय जुन्या आणि पारंपारिक वेबसाईट तसेच अॅप्लिकेशनसाठी ते योग्य असल्याचा दावा लिंडर्से यांनी केला आहे.
गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने आपल्या मायक्रोसॉफ्ट टीमच्या वेब अॅपचा इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट काढून घेतला होता. त्यानंतर या वर्षीच्या शेवटपर्यंत मायक्रोसॉफ्टच्या 365 सेवांचा इंटरनेट एक्सप्लोररचा सपोर्ट काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस 365, वन ड्राईव्ह, आऊटलूक आणि इतर सेवांचा सपोर्ट 17 ऑगस्टनंतर बंद करण्यात येणार आहे.