बहुजननामा ऑनलाईन टीम – नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘ मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, हे वाक्य सोशल मीडियावर मोठया प्रमाणात गाजले होते. अजूनही त्याची चर्चा आहे. नुकतेच भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यात फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने फिडबॅक फॉर्मवर चक्क ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे लिहिले आहे, या अभिप्रायाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भंडारा – गोंदिया जिल्यातील कोका अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, हरीण, नीलगाय या वन्यप्राण्यांसह सुमारे २०० प्रकारचे पक्षी, ५० प्रकारची फुलपाखरे, एक हजार प्रकारच्या वनस्पती आहेत. याशिवाय अजनी हमेशा, राजडोह तलाव याठिकाणी बारमाही पाणी असल्याने वन्यप्राण्यांचे हमखास दर्शन होते. नवेगाव-नागझिरा येथील व्याघ्र प्रकल्पात या अभयारण्याचा समावेश आहे. विशेषत: वाघांसाठी हा अभयारण्य प्रसिद्ध आहे. दररोज हजारो परतक या अभयारण्यास भेट देता.
अश्याच पद्धतीने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही पर्यटक कोका अभयारण्याच्या भ्रमंतीसाठी गेले होते. जंगलात फिरल्यानंतर पर्यटकांना अभयारण्य कसा वाटला, तसेच काही सूचना नमूद करण्यासाठी फिडबॅक फॉर्म भरून मागितला जातो. त्यावेळी भंडारा जिल्ह्यातील दीपक साखरकर या पर्यटकाने फिडबॅक फॉर्ममध्ये सकारात्मक अभिप्राय नमूद करत अमुल्य सूचनेच्या रकान्यात ‘ मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे तिनदा लिहीत आपला सकारत्मक अनुभव दिला.
या अभिप्रायावरून त्याला हे अभयारण्य चांगले वाटले असेल यात शंकाच नाही. मात्र, या विधानावरून राज्याला पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची आठवण झाली.