मुझफ्फरनगर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या एका आमदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मौलाना जमील असे त्या आमदाराचे नाव आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत केवळ काँग्रेसच भाजपला टक्कर देऊ शकतो. त्यासाठी आपण मायावती यांचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जमील यांनी दिल्लीत काँग्रेसचे महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जमील हे बसपाच्या तिकीटावर मीरपूर मतदारसंघातून निवडून आले होते.
निवडणूक जशी जशी जवळ येईल तश्या प्रत्येक पक्षातील अतंर्गत हालचालीना वेग येत आहे .यातच मायावती यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती.