काँग्रेस उमेदवारांचे चाहते मतदारांच्या दारी

April 2, 2019
भोकर : (माधव मेकेवाड) – नांदेड शहरात नरेंद्र मोदींची लाट येणाऱ्या काही दिवसात उसळेल व अशोक चव्हाण यांचा येणाऱ्या निवडणुकीत दारुण पराभव होईल म्हणून आज पर्यंत कुठंही प्रचार, प्रसार न करणारे कार्यकर्ते भोकर शहरात कधी कुठल्याच वॉर्डात न फिरणारे एकसंघटीत होऊन अशोक चव्हाण यांचा, काँग्रेस पक्षाचे टोपी, दस्ती, टाकून भोकर शहरात फिरताना दिसून आले असा प्रचार  केल्यास काँग्रेस पक्षाला चांगला फायदा होऊ शकतो. पण काही भागात अशी चर्चा आहे की काँग्रेसचे नगरसेवक आज पर्यंत वॉर्डात कधीही फिरकलेच नाही ते या निवडणुकीत प्रचारात स्टार प्रचारक म्हणून फिरत आहेत की काय? अशी देखील चर्चा भोकर शहरात सुरू आहे.

मावळलेले कार्यकर्ते एकवटलेली चर्चा, आमचा नेता पडतो की काय म्हणून काँग्रेसकडून मुख्य रस्त्यावर प्रचाराची धास्ती सुरू भोकर शहरात नगरपरिषद काँग्रेसकडे असल्याने त्याच बरोबर आमदार काँग्रेसचा असल्याने प्रचार प्रसार करण्यासाठी गरज पडत नसल्याचे दिसून आले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

आज भोकर शहरात काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद पा. नागेलीकर यांच्या नेतृत्वाखाली विनोद चिंचाळकर, गोविंद बाबा गौड, सूर्यकांत चिंचाळकर, ताहेर बेग, शामसुंदर मेटकर, मनोज गिमेकर, दीपक पोलावार, श्रीमती ढोले सुलोचना, सौ. सुवर्णा वाघमारे यांच्यासह आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक चव्हाण यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी भोकरमध्ये निवडणुकीच्या कार्यकाळात सर्व जण एकत्र येऊन मतदारांना  विनवणी सुरू केली असल्याचे दिसून आले.