बहुजननामा : ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाच्या संकटात नागरिकांसह शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. मान्सूनची प्रतीक्षा संपली असून वेळेआधीच 2 दिवस लवकर मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. काल स्कायमेटने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. रविवारी सकाळी दक्षिण भारतासह अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तामिळनाडूसह पश्चिम कर्नाटकात ढगाळ वातावरण असल्याची माहिती मिळाली आहे.
#JUSTIN Southwest #Monsoon2020 finally arrived on the mainland of India, #Monsoon arrived on Kerala before the actual onset date. All the onset conditions including rainfall, OLR value, wind speed, etc are met. Finally, the 4-month long festival begins for Indian. #HappyMonsoon
— SkymetWeather (@SkymetWeather) May 30, 2020
कर्नाटक आणि गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मुंबईसह कोकणात सातत्याने हवामान बदलत आहे. यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे. केरळच्या वेशीवर असलेला मान्सून महाराष्ट्रात कधी येणार याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. शेतकर्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे.
यंदा मान्सून सरासरीच्या 100 टक्के म्हणजे सामान्य असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या वृत्ताला हवामान विभागाकडून अद्याप दुजोरा देण्यात आला नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये आज वादळी वार्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणार्या वार्यांमुळे हवामानात वेगाने बदल होत अस हवामान विभागाने सांगितले आहे.