बहुजननामा ऑनलाईन टीम – मंदिरा बेदी (Mandira Bedi) साठी बुधवारचा दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. तिने आपले प्रेम आज कायमसाठी गमावले. बुधवारी सकाळी मंदिरा बेदीच्या पतीने अखेरचा श्वास घेतला. मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि तिच्या दोन्ही मुलांसाठी हा दु:खाचा काळ आहे, ज्यातून सावरणे कुटुंबासाठी अवघड आहे. mandira bedi breaks down at husband raj kaushal last rites heartbreaking video
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
मंदिरा बेदीचा पती राज कौशल यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत. राज कौशल यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक सेलेब्स सुद्धा पोहचले होते. राज यांना अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मंदिरा बेदी पतीच्या पार्थिवावाला खांदा देताना दिसत आहे. यावेळी मंदिरा बेदी स्वताला आवरू शकले नाही.
तिची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये दु:ख अनावर झाल्याने ती रडताना दिसत आहे. ज्यावेळी राज कौशल यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जात होते, तेव्हा अॅम्ब्सुलन्सच्या आत बसलेली मंदिरा विलाप करताना दिसत होती.
25 वर्षांची सोबत तुटल्यानंतर झालेले दुख मंदिराला अनावर झालेले दिसत होते. राज कौशलच्या अंत्ययात्रेत रोनित रॉय, अपूर्व अग्निहोत्री सारखे कलाकार दिसले. रोनित आणि राज कौशल जवळचे मित्र होते.
राज कौशल प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. राज यांनी अनेक अॅड बनवल्या होत्या. अवघ्या 49 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबिय हवालदिल झाले आहे.
राज आणि मंदिरा यांना दोन मुले आहेत. मागच्या वर्षी आपले कुटुंब पूर्ण करण्यासाठी त्यांनी 4 वर्षांची मुलगी दत्तक घेतली होती. परंतु आवघ्या 1 वर्षात या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Web Title : mandira bedi breaks down at husband raj kaushal last rites heartbreaking video
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत