बहुजननामा ऑनलाईन- देशभरात वाहतुकीचा नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर काही लोंकांनी याला विरोध केला तर काहीनी समर्थनही केले आहे. दरम्यान, गुजरातमधील वडोदरा येथील एका व्यक्तीने दंड वाचविण्यासाठी एक चांगलीच शक्कल लढविली आहे. राम शाह नावाच्या या व्यक्तीने अवलंबलेली शक्कल पाहून वाहतुक पोलीसही खुष झाले आहेत.
दुचाकी चालविणाऱ्या राम शाह यांच्या हेल्मेटवर वाहन चालविण्याचा परवाना, विमा उतरविण्यासह त्याच्या हेल्मेटचे आरसी बुक आहे. सर्व महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांनी हेल्मेटवरच चिटकविली आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी राम शाहला थांबताच हेल्मेटवरील सर्व कागदपत्रे पाहताच पोलिसही आनंदी होताना दिसत आहेत.
राम शहा म्हणतात की, यामुळे मला त्रास होत नाही आणि नुकसान भरपाईची गरज नाही नवीन मोटार वाहन कायदा १ सप्टेंबरपासून लागू झाला आहे. यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचे प्रमाणही अनेक पटींनी वाढले आहे. मग ते दिल्ली असो वा मुंबई, गुरुग्राम किंवा बेंगलुरू नियम मोडल्यास पोलिस सर्वत्र नजर ठेवून लोकांकडून दंड वसुल करत आहेत. देशाच्या प्रत्येक भागातून असे नियम मोडण्याऱ्यांकडून दंड वसूल कऱण्याच्या घटना घडत आहेत.
कुणाचे २३ हजारांचे चालन कापले गेले तर कुणाला ५९ हजार रुपये द्यावे लागत आहेत. एवढेच नव्हे तर एक लाखापर्यंतच्या चलानही कापण्यात आले आहेत. विशेष म्हणजे स्वत: पोलिसांचे चलान कापले जात आहेत. नियम मोडणाऱ्या पोलिसांकडूनही अहमदाबाद पोलिस आणि चंदीगड पोलिसांनी दंड वसुल केले आहेत.