गुजरात : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये तिहेरी तलाकची घटना समोर आली आहे. एका महिलेला तिच्या प्रायवेट पार्टमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे तिच्या पतीने घटस्फोट दिला आहे. या महिलेने आपल्या पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार या महिलेने असा आरोप केला आहे की पूर्वी पती तिच्यावर अत्याचार करीत असे आणि किरकोळ चुका केल्यावरही तिला सोडण्याची धमकी देत असे. ही महिला 24 वर्षांची आहे. गेल्या वर्षी मे मध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचार्याबरोबर तिचे लग्न झाले होते.
या महिलेने सांगितले की जुलैमध्ये तिला समजले की ती गर्भवती आहे. काही कारणास्तव, तिच्या खाजगी भागात संसर्ग झाला. तिने तिच्या पतीला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले, पण त्याने लक्ष दिले नाही. अलीकडेच तिला तीव्र ताप होता आणि रक्ताच्या उलट्या देखील सुरू झाल्या.
महिलेच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तिला सांगितले की तिच्या प्रायवेट पार्टमध्ये इन्फेक्शन आहे. तसेच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा नवरा रुग्णालयात गेेला तेव्हा डॉक्टरांनी त्याया सांगितले की महिलेच्या खासगी भागात संसर्ग आहे.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर नवरा जेव्हा महिलेला भेटायला गेला, तेव्हा त्याने तिला शिवीगाळ केली. इतकेच नाही तर त्याने दुसरे लग्न करतो असे म्हणत पत्नीच्या कुटूंबासमोर तीन वेळा ‘तलाक’ बोलला आणि निघून गेला. जाण्यापूर्वी त्याने पैशांचीही मागणी केली.