बहुजननामा ऑनलाइन : स्पेनच्या मैड्रिडमध्ये पोलिसांनी स्कर्ट परिधान केलेल्या 500 हून अधिक महिलांचे गुप्त व्हिडिओ बनविल्याप्रकरणी एकाला अटक केली. जेव्हा महिला मेट्रोमध्ये उभ्या असतात, त्याच वेळी हा आरोपी गुप्तपणे त्यांचा व्हिडिओ बनवत असे. तो बॅकपॅकमध्ये लपवलेल्या मोबाईल फोनवरून मुलींचे व्हिडिओ बनवायचा. याला अपस्कर्टींग असेही म्हणतात. पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार, आरोपीने पॉर्न वेबसाइटवर सुमारे 283 व्हिडिओ अपलोड केले आहेत, लाखो जणांनी हे विडिओ पाहिलेदेखील आहेत. पोलिसांनी या पीडित महिलांपैकी 555 जणांची ओळख पटविली असून त्यातील काही मुली अल्पवयीन देखील आहेत.
आरोपी हा 2018 पासून गुप्तपणे मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो रेल्वे स्टेशन व सुपरमार्केटमध्ये हे घाणेरडे कृत्य करीत असे. तसेच त्याने पीडित मुलींचा पाठलाग करुन त्यांच्याशी मैत्रीदेखील केली जेणेकरून तो त्यांच्या जवळ जाऊ शकेल आणि चांगल्या क्वालिटीचे व्हिडीओ आणि फोटोस घेऊ शकेल . पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, लॅपटॉप आणि तीन हार्ड ड्राईव्ह मिळाले ज्यात शेकडो व्हिडिओ आढळले. आरोपीच्या स्वतःच्या वेबसाइटवर 3519 सब्सक्राइबर्स होते आणि हे व्हिडिओ 10 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले होते.
आरोपी कोलंबियाचा रहिवासी असून तो 53 वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे. मेट्रोमध्ये चित्रीकरण करत असताना त्याला रंगेहाथ पकडले गेले आणि ताब्यात घेण्यात आले. ब्रिटनमध्ये हे एका गंभीर गुन्ह्याखाली येते. संमतीशिवाय एखाद्या महिलेच्या कपड्यांखाली कॅमेरा लपवून व्हिडिओ बनवण्याच्या गुन्ह्यामुळे दोन वर्षापर्यंत तुरूंगवासही होऊ शकतो. स्पेनमध्ये अपस्कर्टींग लैंगिक छळ करण्याच्या प्रकारातही येते आणि या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.