मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महात्मा गांधी यांच्या हत्येचा विषय जेव्हा येतो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आणि एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो. आणि तो म्हणजे नथुराम गोडसे. पण ३० जानेवारी १९४८ ला घडलेली ही घटना काही सामान्य नव्हती. संध्याकाळी संपूर्ण देश ज्यांना बापू म्हणायचा त्या महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला होत्या. अशा व्यक्तीला संपवण्याचे काम कोणतीही एकटी व्यक्ती करू शकत नाही. गांधी यांच्या हत्या प्रकरणी ९ जणांवर कोर्टाने आरोप केले होते. त्यापैकी दोन जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तर गांधी हत्याकांडामध्ये फाशीची शिक्षा भोगलेल्या पहिल्या व्यक्तीचे नाव नथुराम गोडसे असल्याचे सर्वांना माहितच आहे. परंतु या प्रकरणात आणखी एक व्यक्ती नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते. गोडसे यांच्याप्रमाणेच त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ रोजी अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
नारायण आपटे यांचा जन्म १९११ मध्ये एका अभिजात ब्राह्मण कुटुंबात झाला. बॉम्बे युनिव्हर्सिटीतून शास्त्र शाखेत पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व प्रकारची कामे केली. १९३२ मध्ये त्यांनी अहमदनगरमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आपटे १९३९ ला हिंदू महासभेत सामील झाल्यानंतर २२ जुलै १९४४ रोजी पाचगणी येथे त्यांनी महात्मा गांधींविरोधात निदर्शेने केली. आणि नंतर १९४८ मध्ये कट रचून गांधींची हत्या केली.
Visit : bahujannama.com