मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व पक्षांनी जवळपास आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहायला लावणाऱ्या भाजप- शिवसेनेनीदेखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. भाजपने आपल्या १२५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यात त्यांनी जवळपास ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली असून, ११ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे.
त्यांनी पुणे येथे गिरीश बापट यांना खासदारकी मिळाल्याने त्यांच्या जागी महापौर मुक्त टिळक यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शहादा येथे विद्यमान आमदार उदेसिंग कोचरु पाडवी यांच्या जागी राजेश पाडवी यांना उमेदवारी जहर केली आहे. त्याचप्रमाणे पुणे कंटोन्टमेन्ट – दिलीप कांबळे ऐवजी सुनील कांबळे, अर्णी – राजू तोडसम यांच्याऐवजी संदीप प्रभाळकर धुर्वे, मुखेड – गोविंद राठोड ऐवजी तुषार राठोड, विक्रमगड – विष्णू सावरा ऐवजी हेमंत सावरा, मुलंड- सरदार तारा सिंग ऐवजी मिहीर कोटेचा, माजलगाव – आर.टी.देशमुख ऐवजी रमेश आडस्कर, शिवाजीनगर – विजय काळे ऐवजी सिद्धार्थ शिरोळे, कोथरूड – मेधा कुलकर्णी ऐवजी चंद्रकांत पाटील, नवापूर -सुरूपसिंग नाईक यांच्या ऐवजी भरत गावित, नागपूर दक्षिण – सुधाकर कोहळे ऐवजी मोहन मेटे या ११ विद्यमान आमदारांचे तिकीट कापून इतर नवीन उमेदवारांना संधी दिली आहे .
परंतु योगेश टिळक- हडपसर, माधुरी मिसाळ- पर्वती, संजय कावरे -भुसावळ, सुरेश भोळ -जळगाव शहर, शिरीष चौधरी-अंमळनेर, मंगेश चव्हाण चाळीसगाव, चैनसुख संचेती-मलकापूर, श्वेता महाले- चिखली, डॉ.संजय कुटे -जळगाव -जामोद ,, गोवर्धन शर्मा अकोला पश्चिम, रणधीर सावरकर -अकोला पश्चिम, हरीश पिंपळे मूर्तिजापूर, लखन मलिक वाशीम, डॉ.राजेंद्र पटनी- कारंजा, डॉ.सुनील देशमुख -अमरावती, रमेश बुंदिले -दर्यापूर, डॉ.अनिल बोन्डे -मोर्शी, दादाराव केचे -आर्वी, समीर कुणावर -हिंगणघाट, डॉ.राजीव पोतदार-सावनेर, समीर मेघे- हिंगणा, सुधीर पार्वे -उमरेड, मोहन मेटे -नागपूर दक्षिण, विकास कुंभारे -नागपूर मध्य, सुधाकर देशमुख -नागपूर दक्षिण, मिलिंद माने -नागपूर उत्तर, मनीषा चौधरी – राजकुमार बडोले दहिसर -अर्जुनी मोरगाव , अतुल भातखळकर- कांदवली पूर्व, योगेश सागर – चारकोर, विद्या ठाकूर- गोरेगाव, अमित साटम – अंधेरी पश्चिम, पराग अळवणी- विलेपार्ले, रॅम कदम -घाटकोपर पश्चिम, आशिष शेलार वांद्रे पश्चिम, तामिळ सेल्वान- सायन कोळीवाडा , लक्ष्मण जगताप- चिंचवड, जगदीश मुळीक – वडगाव शेरी, भीमराव तापकीर खडकवासला, आकाश फुंडकर -खामगाव, प्रकाश भारसाकळे -अकोट, पंकज भोयर- वर्धा, कृष्णा खोपडे -नागपूर पूर्व, या विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
Visit : Bahujannama.com