मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आमदार रमेश कदम यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ५१२ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना निलंबित केले होते. महिनाभर फरार असलेल्या कदमांना सीआयडीने पुण्यातील ग्रँड हयात हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने त्यांची मुंबईच्या ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात परवानगी झाली होती.
मोहोळचे राष्ट्रवादीचे निष्काषित आमदार असलेले रमेश कदम हे तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ते या निवडणुकीत अपक्ष लढण्याची शक्यता आहे. याशिवाय पोलीस बंदोबस्तात विधानभवनात आलेल्या कदमांनी जाहीरपणे भाजपला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं होतं. यापूर्वी त्यांनी अनेकदा कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आज हायकोर्टाने जामीन मंजूर केला.
Visit : bahujannama.com