Maharashtra Rain Update | राज्यात आज मुसळधार; पुण्यासह रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने (Maharashtra Rain Update) जोर धरला आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगड (Raigad), पालघर (Palghar), पुणे (Pune) आणि सातारा (Satara) या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे, याबाबत हवामान खात्याने (Indian Meteorological Department) माहिती दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आज (बुधवार) मुसळधार पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता वर्तवली आहे. कोकणासह (Konkan) मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) जोरदार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी (Ratnagiri), कोल्हापूर (Kolhapur), ठाणे (Thane), नाशिक (Nashik), यवतमाळ (Yavatmal), चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह (North Maharashtra) विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’
मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी (Mumbai) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन दिवस 100 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. कोकणातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हिंगोलीतही दमदार पाऊस
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली.
हिंगोली कळमनुरी वसमत औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
या पावसामुळे कापूस, हळद, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळणार आहे.
तसेच जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. या पावसामुळे शेतकरी आनंदात आहे.
Web Title : Maharashtra Rain Update | heavy rain warning in the state today imd rain
- Ashish Sakharkar Passes Away | मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचे निधन
- Pune BJP News | पुणे भाजप शहराध्यक्षपदी धीरज घाटे तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती
- Maharashtra Political Crisis | अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, दादांनी आज पुन्हा थोरल्या पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण
Comments are closed.