मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून केला होता. त्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच आता ‘क्राईम इंटेलिजन्स युनिट’च्या (CIU) कार्यालयातून जप्त केलेल्या डायऱ्यांमधून सचिन वाझे यांच्या वसूलीकांडचा ‘राज’ उघडणार असल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. त्यातच त्यांनी म्हटले, की ‘महाराष्ट्रात मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून भ्रष्टाचार चालतो. याचा खुलासा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कारवाई केली आहे. माझ्या गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळात इंटेलिजेन्स कमिशनच्या (SID) माध्यमातून एक रॅकेटचा भांडाफोड केला होता. आम्ही गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या परवानगीने काही कॉल इंटरसेप्ट केले आहेत. ज्यामध्ये काही बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे’.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी रिपोर्ट गृहमंत्र्यांना पाठवला होता. रिपोर्टवरून कारवाई करण्याऐवजी इंटेलिजन्स कमिश्नर रश्मी शुक्ला यांनाच कारवाईला सामोरे जावे लागले होते. मोठी नावे उघड केल्यानंतर त्यांना सन्मान दिला गेला नाही. यासह या रिपोर्टवरून कोणतीही कारवाईही केली गेली नाही. तर इंटरसेप्शनमध्ये आरोपी लोकांना पदोन्नती देण्यात आली’.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद https://t.co/nfQUDXgSKE
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2021
दरम्यान, सीओआयने एक सविस्तर रिपोर्ट तयार केला आहे. जो 25 ऑगस्ट 2020 ला डीजी आणि गृह विभागाचे एसीएस यांच्याकडे सोपविला होता. यामध्ये सखोल चौकशीची मागणी केली गेली. मुख्यमंत्र्यांना या गंभीर बाबीवर माहिती देण्यात आली होती. त्यांनीही चिंता व्यक्त केली. माझ्याकडे 6.3 जीबीचा कॉल डाटाही आहे, असेही ते म्हणाले. माझ्याकडे असलेल्या ट्रान्सफर आणि पोस्टींगच्या रॅकेटमधील सर्वांचे पुरावे उपलब्ध आहेत. ते सर्व पुरावे मी केंद्राच्या होम सेक्रेटरी यांना आज (मंगळवार) संध्याकाळी देणार आहे. त्यासाठी मी आता पत्रकार परिषद संपल्यानंतर दिल्लीला रवाना होणार आहे. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांमध्ये अनेक आयपीएस अधिकारी (जे थेट केंद्राच्या अखत्यारित येतात), राजकारणी तसेच इतर पोलिस अधिकार्यांची नावे आहे. त्याबाबतची माहिती मिडीयाला देणार नाही मात्र सर्व पुरावे होम सेक्रेटरी यांच्याकडे आज संध्याकाळी सुपुर्द करणार आहे. याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील मी त्यांच्याकडे करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आज सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकारणात आणि पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. बदल्यांचे रॅकेट अन् पोस्टींग यापुर्वी देखील चर्चेचा विषय बनला होता. याची सीबीआय चौकशी झाल्यास कोणा-कोणाचा पर्दाफाश होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.