पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfers – DySP / ACP | राज्यातील पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या 119 अधिकार्यांच्या सोमवारी रात्री उशिरा सर्वसाधारण बदल्या करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातील 5 सहाय्यक पोलिस आयुक्तांची पुणे पोलिस आयुक्तालयाबाहेर बदली करण्यात आली आहे तर पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये 11 जणांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये काहीजण पदोन्नतीवर पुणे पोलिस आयुक्तालयात आले आहेत. पुण्यात बदली झालेल्यांमध्ये भीमराव टेळे, आप्पासाहेब शेवाळे, जगदीश सातव, संजय पाटील, सुनिल तांबे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
बदली झालेल्या अधिकारी नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे. (Maharashtra Police Transfers – DySP / ACP)
1. नंदा राजेंद्र पाराजे ACP Nanda Rajendra Paraje (अॅन्टी करप्शन, पुणे ते एसीपी, पुणे शहर)
2. अश्विनी गणेश राख ACP Ashwini Ganesh Rakh (पोलिस उप अधीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते एसीपी, पुणे शहर)
3. भीमराव सावळा टेळे ACP Bhimrao Sawala Tele (उपविभागीय पोलिस अधिकारी, उमरेड उपविभाग, नागपूर ग्रामीण ते एसीपी, पुणे शहर)
4. जगदीश दत्तात्रय सातव ACP Jagdish Dattatray Satav (एसीपी, ठाणे शहर ते एसीपी, पुणे शहर)
5. संजय आकाराम पाटील ACP Sanjay Apkaram Patil (एसीपी, बृहन्मुंबई ते एसीपी, पुणे शहर)
6. आप्पासाहेब बाबुराव शेवाळे ACP Appasaheb Baburao Shewale (पोलिस उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते एसीपी, पुणे शहर)
7. संजय ज्ञानदेव सुर्वे ACP Sanjay Dnyandev Surve (एसीपी, नागपूर शहर ते एसीपी, पुणे शहर)
8. सुनिल जयसिंग तांबे Sunil Jaising Tambe (पोलिस उप अधीक्षक, दहशतवाद विरोध पथक (एटीएस), छत्रपती संभाजीनगर ते एसीपी, पुणे शहर)
खाली नमुद केलेल्या पोलिस अधिकार्यांना पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर बढती मिळाली असून त्यांना पुणे पोलिस आयुक्तालयात पदस्थापना देण्यात आली आहे.
1. शाहुराव भाऊराव साळवे ACP Shahurao Bhaurao Salve (सहाय्यक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
2. वसंत वामन कुंवर ACP Vasant Vaman Kunwar (एसीपी, पुणे शहर)
3. मच्छिंद्र रामचंद्र खाडे ACP Machchindra Ramachandra Khade (एसीपी, पुणे शहर)
4. अशोक विश्वासराव धुमाळ ACP Ashok Vishwasrao Dhumal (एसीपी, पुणे शहर)
दरम्यान,
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या अमरावती परिक्षेत्राच्या अॅन्टी करप्शन विभागात अप्पर पोलिस अधीक्षक असेलेले अरूण साहेबराव सावंत (ACP Arun Sahebrao Sawant) यांची पुणे येथे कारागृह विभागात पोलिस उप अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
Web Title : Maharashtra Police Transfers – DySP / ACP | Transfer of 12 ACP to Pune including Assistant Commissioner of Police Bhimrao Tale, Sanjay Patil, Sunil Tambe, Appasaheb Shewale, Jagdish Satav, Vasant Kunwar, Machhindra Khade