मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाने दमदार (Maharashtra Monsoon Update) हजेरी लावली आहे. अशातच मुंबईसह (Mumbai) उपनगर ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) परिसरात दोन दिवसांपासून पाऊस कोसळताना दिसतो आहे. पुण्यासह (Pune) राज्यातील इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला असल्याचं चित्र आहे. दरम्यान, आज (सोमवार) आणि उद्या (मंगळवार) भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह उपनगरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर चार दिवस कोकणसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती हवामान खात्यानं (IMD) दिली आहे. दरम्यान, कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तसेच, पुण्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. (Maharashtra Monsoon Update)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
20 jun:राज्यात मान्सून सक्रिय:
IMD कडून 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामानाचा इशारा.#मुंबई ठाणे व अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम.
Monsoon Active over Mah state:Severe weather alerts for 5 days by IMD.Heavy RF alerts cont including Mumbai Thane.
Watch IMD updates pl pic.twitter.com/ejuzWm3HvF— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 20, 2022
या दरम्यान, नैऋत्य मान्सून कालच गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड,
गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे.
राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला असला तरी अजुन राज्याच्या इतर भागात मात्र पावसाची प्रतिक्षा कायम असल्याचं चित्र आहे.
9 am: 20 Jun,Something we were waiting for long…
Low Medium dense clouding over west coast including Mumbai Thane around and parts of madhya Mah, Vidarbha …
Its raining …🌧☔☔
कोकणात जोरदार ची शक्यता…पुणे ढगाळ आकाश, पावसाळी वातावरण …. pic.twitter.com/EDUGwxjShf— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 20, 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon active over maharashtra state severe weather alerts for 5 days by imd heavy rf alerts cont including mumbai thane maharashtra news
हे देखील वाचा :