मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचे (Vidhan Parishad Election 2022) मतदान चार वाजता संपले. सर्वच्या सर्व आमदारांनी (MLA) मतदानाचा (Voting) हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजता मतमोजणी सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसने (Congress) भाजपच्या (BJP) दोन उमेदवारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरु असताना बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध
हितेंद्र ठाकूर म्हणाले, मला फक्त काँग्रेसचे नेते विधानसभेत (Assembly) भेटले आणि घेऊन गेले नाहीत. तुमचे फुटेज बघा आधी भाजपचे नेते आले त्यानंतर काँग्रेसचे नेते आले. यानंतर राष्ट्रवादी (NCP) सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध आहेत. मी कोणावरही नाराज नाही, सगळे मला भेटले विनंती केली. लोकशाहीत मतदानाचा अधिकार मी बजावला आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी प्रत्युत्तर दिले.
आमदार काय मच्छिबाजार वाटला का ?
राज्यसभा निवडणुकीनंतर (Rajya Sabha Election) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार फुटल्यासंदर्भात आरोप केले होते. यासंदर्भात विचारले असता हिंतेंद्र ठाकूर म्हणाले, या निवडणुकीचा निकाल लागला की कळेल, कोण फुटले आणि कोण नाही, असे सांगत जो निवडणुकीत हरतो, तो असे खापर दुसऱ्यांवर फोडत असतो. आमदार काय मच्छिबाजार वाटला का, अशी विचारणा केली. तर तुमच्यात हिंमत असेल, तर सगंळ्यांसमोर एकदा काय ते जाहीर करुन टाका. संजय राऊत यांनी त्यांना अपेक्षित मते मिळाली नाही, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. माझ्यावर आरोप केले नव्हते, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आणखी काय म्हणाले ठाकूर ?
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आईचे दूध विकू नये, हे केलेले विधान योग्य आहे.
कोणीही गद्दारी न केलेलीच बरी असते.
– मोठ्या पक्षांकडे व्होट बँक असते. परंतु लहान पक्ष आणि अपक्षांना परिश्रम करुन आणि आपल्या कामाच्या जोरावर निवडून यावे लागते.
– मोठ्या पक्षाचे पाठबळ त्या त्या उमेदवाराच्या मागे असते. त्यांना काही प्रमाणात कमी मेहनत घ्यावी लागते.
मात्र, आमच्यासारख्या लहान पक्षांना 100 टक्के मेहनत घ्यावी लागते.
– दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये सर्वपक्ष आमच्या विरोधातच निवडणूक लढवत असतात. आताही येणाऱ्या निवडणुकीत ते आमचे विरोधक म्हणून लढणार आहेत.
– क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) परदेशात गेले होते.
भेटायला आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच आमच्या कार्यकर्त्यांनी फारच आग्रह धरला.
म्हणून ते आले. विमानतळावरुन थेट विधिमंडळात आले. ते घरी देखील गेले नाहीत.
Web Title :- Vidhan Parishad Election 2022 | bva hitendra thakur replied shiv sena sanjay raut after cast vote in vidhan parishad election 2022
हे देखील वाचा :
Premium Financing | इन्श्युरन्स प्रीमियम आता ओझे नाही, भरण्यासाठी मिळेल कर्ज, जाणून घ्या नवीन नियम
Punit Balan Group | पुनीत बालन ग्रुपने भारतीय स्टार टेनिसपटू ऋतुजा भोसले सोबत केला करार !