Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate | येत्या 15 दिवसात जात प्रमाणपत्रासंदर्भात बैठक घेणार – मंत्री अतुल सावे

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate | विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक असते. तिल्लोरी कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र वेळेत दिले जाण्याबाबतची सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना करण्यात येईल आणि येत्या १५ दिवसात याबाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल, असे मंत्री अतुल सावे (Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate) यांनी विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सदस्य राजन साळवी (Rajapur Shivsena MLA Rajan Salvi) यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य शेखर निकम (Chiplun NCP MLA Shekhar Nikam), योगेश सागर (Charkop BJP MLA Yogesh Sagar) आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant) यांनीही प्रश्न उपस्थित केले.
सावे (Aurangabad BJP MLA Atul Save) म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तिल्लोरी कुणबी समाजातील व्यक्तींकडून ओबीसी प्रवर्गाची जातीच्या दाखल्यासाठी प्राप्त होणारी प्रकरणे सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून स्वीकारण्याची कार्यवाही गेल्या २ महिन्यांपासून सुरु आहे. येत्या १५ दिवसांमध्ये उर्वरित कुणबी -८३ जातीचे दाखले देण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात येईल.कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. (Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate)
तिल्लोरी कुणबी समाजाच्या (Kunbi Samaj) संघटनेने राज्य मागासवर्ग आयोगाकडे इतर मागास वर्गाच्या यादीत समावेश होण्याबाबत लेखी विनंती केली आहे. या मागणीनुसार २३ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी येथे आणि १० मार्च २०२३ रोजी पुणे येथे राज्य मागासवर्ग आयोगाने (Maharashtra State Backward Class Commission) समाज संघटनेसोबत सुनावणी घेतली आहे. आयोगाने संघटनेस पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर राज्य शासनाकडून (Maharashtra State Govt) याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सावे यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate | Maharashtra Minister Atul Save will hold a meeting regarding caste certificate in next 15 days
हे देखील वाचा :
Satara Crime News | पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघां मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Comments are closed.