Pune Daund News | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे रासायनिक औद्योगिक वसाहतींमुळे होणाऱ्या प्रदूषणसंदर्भात बैठक घेणार

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Pune Daund News | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ (Kurkumbh MIDC) येथे रासायनिक औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषण होत आहे. त्यामुळे यावर तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. (Pune Daund News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विधानसभा सदस्य ॲङ राहूल कुल (MLA Adv Rahul Kul) यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री केसरकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत
असून यामध्ये जल प्रदूषण करणारे एकूण 69 उद्योग आहेत. यापैकी 29 उद्योग हे प्रक्रिया केल्यानंतर त्यांचे
सांडपाणी पुढील प्रक्रियेकरिता सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये पाठविण्यात येते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधून कोणत्याही उद्योगामधून प्रक्रिया केलेले किंवा प्रक्रिया न केलेले
औद्योगिक सांडपाणी नदी पात्रात सोडले जात नाही. कुरकुंभ औद्योगिक वसाहतींमधील 2022 मध्ये दोषी
आढळून आलेलया 2 उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश आणि 10 उद्योगांना प्रस्तावित निर्देश आणि 2
उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.या प्रदूषणामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत चौकशी करण्यात येईल. (Pune Daund News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Daund News | Minister Deepak Kesarkar will hold a meeting regarding the pollution caused by chemical industrial estates at Kurkumbh in Daud taluka of Pune district
हे देखील वाचा :
Satara Crime News | पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघां मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Comments are closed.