नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Covid Vaccination | तीन कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करणारी लस पूर्णपणे देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनले आहे. महाराष्ट्राच्या सीएमओकडून याबाबत माहिती देण्यात आली. तीन कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येला दोन्ही डोस देण्याच्या विक्रमी आकड्यापर्यंत पोहचणे राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी खुप मोठे यश आहे. सीएमओकडून सांगण्यात आले की, संपूर्ण लसीकरणाचे राज्य बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील (Maharashtra Covid Vaccination) आहोत.
तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी माहिती देताना सांगितले की,
कोविड-19 प्रतिबंधक लसीचे 51 लाख डोस देण्यासह देशात आतापर्यंत 103 कोटीपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, रात्री उशीरापर्यंत अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत लसीकरणाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, लसीकरण अभियानाच्या तिसर्या टप्प्याला सुरूवात झाल्यानंतर 18-44 वर्ष वयोगटाला 41,10,37,440 पहिला डोस आणि 13,11,13,078 दुसरा डोस देण्यात आला. मंत्रालयाने म्हटले की, आतापर्यंत एकुण 72,13,19,294 जणांना पहिला डोस आणि 31,35,17,300 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोविड-19 लसीकरणाचा आकडा मंगळवारी 103 कोटीच्या पुढे गेला. (Maharashtra Covid Vaccination).
web title: Maharashtra covid vaccination corona vaccine india latest news maharashtra crossed the milestone of 3 cr fully vaccinated citizens highest for any state in the country.
Pune Forest caught leopard | तब्बल 17 तासानंतर पुण्याच्या हडपसर परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद