Maharashtra BJP | फडणवीस हे दहावे आश्चर्य म्हणणाऱ्या संजय राऊतांना भाजपाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अहो, उंटावरचे शहाणे…’

Maharashtra BJP | bjp replied to sanjay raut statement on devendra fadnavis tenth wonders in world

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी पहाटेच्या शपथविधीबाबत (Swearing in) गौप्यस्फोट केला होता. यावर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहेत, असा खोचक टोला लगावला होता. दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेला महाराष्ट्र भाजपाने (Maharashtra BJP) ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटमध्ये संजय राऊतांचा उल्लेख ‘उंटावरचे शहाणे’ असा करत किती बोलता? असा प्रश्न महाराष्ट्र भाजपाने (Maharashtra BJP) विचारला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय म्हटले ट्विटमध्ये?

अहो, उंटावरचे शहाणे संजय राऊत, किती बोलता? शरद पवारांनी (Sharad Pawar) तुम्हाला कामावर ठेवलं आहे का? तुम्ही बोलून बोलून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) संपवण्याचा विडा उचलला आहे का? जे शिल्लक आहेत त्यांनाही पक्षही सोडायला भाग पाडणार आहात का? संजय राऊत उद्धवसेनेला शिल्लकवरुन ‘क्षुल्लक सेना’ करणार असं दिसतं आहे, असा पलटवार भाजपने (Maharashtra BJP) केला आहे.

 

 

काय म्हणाले होते संजय राऊत?

देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून ज्या प्रकारची वक्तव्य येत आहेत. त्यावरुन वाटतं की देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहेत. आधीच आठ आश्चर्य या जगात आहेत. आणखी दोन आश्चर्य दिल्लीत आहेत आणि एक आश्चर्य महाराष्ट्रात आहे. माणसाने किती खोटं बोलावं याला मर्यादा असते. मुळात तुम्ही विश्वासघात केल्याने हे घडलं. फडणवीसांनी आधी त्यांची जुनी वक्तव्य काढून बघावीत. ते स्वत: अमित शहांसमोर (Amit Shah) काय बोलले होते? त्यामुळे स्वत:चा विश्वासघात केल्यानंतर आता गळा काढण्यात काहीही अर्थ नाही. जर या शपथविधीला शरद पवारांची मान्यता होती, तर ते सरकार पाच वर्षे चाललं असतं, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra BJP | bjp replied to sanjay raut statement on devendra fadnavis tenth wonders in world

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Decision | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार

WPL Auction 2023 | महिला आयपीएलच्या लिलावात कोणत्या खेळाडूवर किती बोली लागली? जाणून घ्या

Shubman Gill | ‘या’ खेळाडूंना मागे टाकत शुबमन गिल ठरला ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’