Uddhav Thackeray | पाशवीवृत्ती संपूर्ण देशाला खावून टाकेल, बीबीसीच्या कार्यालयावरील धाडीवरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बीबीसीच्या कार्यालयात मंगळवारी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी (BBC Delhi Office IT Raid) दाखल झाले. त्यांनी कार्यालयात पाहणी केली. यावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना Shivsena (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावरुन टीका केली आहे. ही पाशवीवृत्ती आज आपल्या देशात फोफावायला बघतेय. आपण वेळेवर एकत्र आलो नाहीत आणि ताकद वाढवली नाही तर संपूर्ण देश खाऊन टाकेल अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि मोदी सरकारवर (Modi Government) घणाघात केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे कोणत्या लोकशाहीत बसते?
लोकशाहीच्या चार स्तंभात माध्यम हा महत्त्वाचा स्तंभ आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकली. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या (Media) कार्यालयावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? म्हणजे आम्ही वाटेल ते करु पण तुम्ही आवाज उचलायचा नाही. जर आवाज उठवला तर चिरडून टाकू. ही पाशवीवृत्ती आज आपल्या देशात फोफावायला बघतेय. आपण वेळेवर एकत्र आलो नाहीत आणि ताकद वाढवली नाही तर संपूर्ण देश खाऊन टाकेल अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला आहे.
आपल्याला एकत्र आले पाहिजे
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. तेव्हा म्हटले होते की, त्यावेळची लढाई स्वातंत्र्याची होती. आता हे स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे. स्वातंत्र्य टिकवायचं कारण गुलामगिरी ही गुलामगिरीच असते. मग ती स्वकियांची असेल किंवा परकियांची. आता वंदे भारत, वंदे मातरम या घोषणा दिल्या जात आहेत. पंतप्रधान उद्घाटन करत आहेत. झेंडे दाखवले जात आहे. मात्र त्याचवेळी माझी भारतमाता पुन्हा गुलाम कशी होईल यादिशेने मोदींची पाऊले जात आहेत. ही पाऊले ओळखून आपल्याला एकत्र आले पाहिजे असं ठाकरे यांनी सांगितले.
हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व
रियाजशेठ सारखे हजारो मुस्लिम बांधव शिवसेनेत आले. त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व (Hindutva) सोडलं असं
कुणी म्हणत असेल तर काही महिन्यापूर्वी मोहन भागवत (Mohan Bhagwat) मशिदीत गेले होते त्यांनी काय
सोडलं? दत्तात्रय होरपाळे (Dattatraya Horpale) यांनी गोमांस खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाहीत
असं विधान केलं होतं मग त्यांनी काय सोडलं? या भानगडीत आपल्याला जायचं नाही.
हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व या शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीनुसार आपल्याला पुढे जायचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackerays reaction on income tax raid at bbc office
हे देखील वाचा :
Comments are closed.