अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – निवडणुका जवळ आल्या की अनेक नेते एकमेकांवर टिका करत असता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करतांना केलेल्या हातवाऱ्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
शरद पवार अहमदनगरच्या प्रचार सभेत म्हणाले की, प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले त्यांनी आठ- नऊ ठिकाणी सभा घेतल्या. देशाचे गृहमंत्री २० ठिकाणी गेले आणि मुख्यमंत्री म्हणताय की, कुस्ती खेळायला पहिलवानाचं नाही तर मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी कशाला येत आहेत असे पवार म्हणाले.
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर पैलवान दिसत नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभेत समाचार घेतला. या सभेत पवार म्हणाले, “मुख्यमंत्री सांगतात, त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. बाळा मी महाराष्ट्र कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,” असं प्रतित्युत्तर पवार यांनी दिलं.
Visit : bahujannama.com