महाबळेश्वर : बहुजननामा ऑनलाईन – महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील वेण्णालेक (Vennalek) रोडवरील प्रतापसिंह उद्यानाजवळ 7 ते 8 फूट खोल खड्ड्यात कार कोसळून अपघात झाला. या अपघातात पुण्यातील (Pune) भुलतज्ज्ञ डॉ. रिमा मनोहर बोधे (anesthesiologist Dr. Rima Manohar Bodhe) (वय-32) या जखमी झाल्या आहेत. डॉ. बोधे यांच्या डोक्याला मार लागला असून स्थानिकांनी कारमधील दोन जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉ. रिमा ह्या मित्रासोबत महाबळेश्वरला (Mahabaleshwar) सहलीसाठी आले होते. Mahabaleshwar News | Lady doctor accident car crash on Vennalek in mahabaleshwar’s
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाबळेश्वर येथून मध्यरात्री एक वाजता नोबिन खान व मुस्तकिन बागवान हे दोघे वाईकडे निघाला होते. प्रतापसिंह उद्यानाजवळ (Pratap Singh Park) येताच त्यांना महिलेचा वाचवा-वाचवा असा आवाज आल्याने ते थांबले. त्यावेळी कार खड्ड्यात कोसळल्याचे त्यांना दिसले. स्थानिक युवकांनी कारमधील जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) उपचारासाठी दाखल केले.
ISI | अफगाणिस्तानातील भारतीय संपत्तीला टार्गेट करा; ISI चा तालिबानी दहशतवाद्यांना निर्देश
डॉ. रिमा महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेल्या होत्या.
साडेबाराच्या सुमारास त्यांची कार प्रतापसिंह उद्यानाजवळ आली.
त्यावेळी बारीक पाऊस पडत होता. रस्त्यावर प्रचंड धुके होते.
त्यातच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट देखील बंद होत्या.
त्यामुळे वाहनचालकाचा अंदाज चुकल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावरुन खोल खड्ड्यात कोसळली.
Web Titel :- Mahabaleshwar News | Lady doctor accident car crash on Vennalek in mahabaleshwar’s
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 364 नवीन रुग्ण