पुणे : बहुजननामा ऑनलाईन – IMD News मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं आहे. काल रात्रभर धुव्वाधार पाऊस (heavy rain) झाल्याने मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले. आज मुंबईसह पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. तर चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील नऊ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
18 Jul, Latest satellite obs at 16.20 hrs indicate clouds over entire Konkan region, adjoining Arabian sea and parts of Madhya Maharashtra too.
Also there are bands of clouds observed over interior of state too, parts of Marathwada and Vidarbha.
Watch for nowcast from IMD pl. pic.twitter.com/pGlkOfaGCi— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 18, 2021
ISI | अफगाणिस्तानातील भारतीय संपत्तीला टार्गेट करा; ISI चा तालिबानी दहशतवाद्यांना निर्देश
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी (दि.19) तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) घाट परिसरात शनिवारपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत गगनबावडा 120, लोणावळा (Lonavala), महाबळेश्वर 80, इगतपुरी, ओझरखेडा, राधानगरी 50, बरसी, राहुरी, सांगोला 40 मिमी पावसाची नोंद झाली.
‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
सोमवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात रेड अलर्ट (Red alert) देण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) घाट परिसरात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवला आहे.
Web Titel :- IMD Alert | heavy rains expected pune district next four days warning heavy rains ghat area western maharashtra
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 364 नवीन रुग्ण