MP : पत्नीला मारहाण करणार्‍या स्पेशल डीजींवर मोठी कारवाई, कार्यमुक्त केल्यानंतर गृहमंत्रालयाशी करण्यात आलं ‘संलग्न’

September 28, 2020

बहुजननामा ऑनलाइन – मध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम लाल शर्मा यांचा आणखी एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. पुरुषोत्तम शर्मा त्यांना आपल्या पत्नीला मारहाण करताना आतापर्यंत पाहिले होते. असे सांगितले जात आहे की, नवीन व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना एका मुलीसह पकडले होते.

यापूर्वी स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा आपल्या पत्नीला निदर्यीपणे मारहाण करताना दिसले होते. डीजी पुरुषोत्तम शर्मा यांनी कबूल केले आहे की, ते व्हिडिओमध्ये आहेत आणि ते कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहेत. याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही. मात्र पुरुषोत्तम शर्मा यांना त्यांच्या पदावरून काढून टाकून गृहमंत्रालयाशी जोडले गेले आहे.

अद्याप कोणती तक्रार आलेली नाही 

एडीजी उपेंद्र जैन म्हणतात की, कोणतीही औपचारिक तक्रार मिळालेली नाही. ज्या व्यक्तीने व्हिडिओ पाठवला आहे, त्याने दावा केला आहे की तो मुलगा आहे, परंतु अद्याप त्याची सत्यता निश्चित करणे बाकी आहे. मोबाईलवर पाठवलेल्या तक्रारीच्या आधारे एका महिला पोलिस अधिकाऱ्याला पुरुषोत्तम शर्मा यांच्या घरी पाठवण्यात आले, पण त्यांच्या पत्नीने तक्रार नोंदवण्यास नकार दिला आहे.

 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलिस महासंचालक स्तरावरील आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा आपल्या पत्नीला मारहाण करत आहेत. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, पोलिस अधिकाऱ्याने पत्नीला जमिनीवर ढकलले आणि तिला बेदम मारहाण करत आहे. या दरम्यान घरात उपस्थित कर्मचारी बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, या वादामागे पोलिस अधिकाऱ्याचा दुसऱ्या महिलेशी संबंधाचे कारण आहे. याबाबतच पती-पत्नीमध्ये बराच काळापासून वाद सुरू आहे. पुरुषोत्तम शर्मा यांचे नाव हनी ट्रॅप प्रकरणातही समोर आले आहे.