नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलपीजी (Liquefied Petroleum Gases) म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमतीने (LPG Price) लोकांच्या किचनचे बजेट बिघडवले आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलची महागाई आणि दुसरीकडे एलपीजीच्या किंमती (LPG Price) आकाशाला पोहचल्या आहेत. दिल्लीत एलपीजी सिलेंडरचा दर 843 रुपयांवर पोहचला आहे. परंतु याच दरम्यान आम्ही तुम्हाला एक असा पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही महागड्या एलपीजीपासून सुटका करून घेऊ शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एलपीजीच्या तुलनेत वीज यंत्र स्वस्त
एलपीजीच्या तुलनेत वीजेवर चालणारे कुकर, इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हद्वारे स्वयंपाक बनवल्यास तो परवडणारा ठरू शकतो. तर, पीएनजी (Piped Natural Gas) सुद्धा एलपीजीपेक्षा सुमारे 60 टक्के स्वस्त पडत आहे. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टीट्यूटचे असोसिएट डायरेक्टर दीपक श्रीरामकृष्णन यांच्यानुसार आता दिल्लीत एलपीजीच्या तुलनेत इलेक्ट्रिक कुकिंग स्वस्त आहे.
इलेक्ट्रिक स्टोव्हचा खर्च कमी
दिल्लीत वीजेचा दर 8 रुपये प्रति युनिट आहे. तर गॅस सिलेंडरचा दर 843 रुपये आहे. अशावेळी 10 लीटर पाणी उकळवण्यासाठी 10.15 रुपयांचा एलपीजी खर्च होतो आणि जर ते इलेक्ट्रिक स्टोव्हवर गरम केले तर 9.46 रुपयांची वीज खर्च होते. अशावेळी खुप पैसे वाचवू शकता. सोबतच लक्ष द्या की ज्या राज्यांमध्ये वीजेवर सबसिडी मिळत आहे, तिथे हा खर्च आणखी कमी आहे.
सहा महिन्यात 140 रुपये प्रति सिलेंडर महागला एलपीजी 1 जुलै, 2021 ला स्वयंपाकांच्या गॅस
सिलेंडरची किंमत 140 रुपयांनी वाढून 834 रुपये करण्यात आली. सोबतच सरकारने 2020मध्ये
स्वयंपाकाच्या गॅसरवर देण्यात येणारी सबसिडी बंद केली आहे. या करणामुळे ग्राहकांना पूर्ण किंमत
चुकवावी लागत आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे.
Web Title : lpg price lpg price cooking with lpg is more expensive follow this option for cheap cooking
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | गोल्डच्या दरात आजसुद्धा नोंदली गेली तेजी, चांदीची चमक परतली, पहा आजचे बंद भाव