मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर जस जसे हवेत वातावरण तापत आहेत तसे राजकीय वातावरणही तापत आहे. एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. हे आरोप-प्रत्यारोप तसेच एकमेकांची खिल्ली उडवण्याचा उपक्रम हा भाषणातच होत नसून सोशल मीडियावरही सुरू आहे. या सर्वातच आज हनुमान जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसने एक ट्विट करत ‘बुरे दिनो की ‘लंका’ जलेंगी ‘असा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे.
लोकसभेच्या रणधुमाळीत जातीयवादाचा मुद्दा अधिकच गाजताना आपणाला दिसत आहे .याच मुद्दावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर वरून हनुमान जयंतीची संधी साधून एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. त्या व्यंगचित्रामध्ये भाजपची सेना दाखवली आहे. ‘लगता हे अब बुरे दिन की लंका तो जलानी ही पडेगी’ असा उल्लेख करत हनुमान येऊन त्यांच्याभोवती आग लावून जातो, असे चित्रामध्ये दर्शवले आहे.