बहुजननामा ऑनलाइन टीम – लोणिकंद : प्रतिनिधी – राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून काही नियम अटी घालून दिले आहेत. परंतु या नियमांचे मोठ्या प्रमाणात जागोजागी उल्लंघन होताना दिसत आहे . लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील बकोरी येथील विवाह समारंभ चौंधे फॉर्म येथे संपन्न झाला. येथे शासकीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी बकोरी येथील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोणिकंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आतकरे पोलीस हवालदार बाळासाहेब गाडेकर ,पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश व्यवहारे, पोलीस कॉन्स्टेबल मुत्याळ हे सर्वजण लोणिकंद पोलीस स्टेशन हद्दीत लोणीकंद ते तुळापुर परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना वढु खुर्द येथील चौंधे फार्म येथे लग्न सोहळा संपन्न होत असल्याचे समजते त्याठिकाणी त्यांनी जाऊन पाहणी केली असता तेथे कोणतेही प्रकारच्या शासकीय नियमांचे तसेच सूचनाचे पालन केल्याचे दिसून आले नाही .तसेच काही लोकांनी तोंडाला मास्क देखील लावण्यात आले नव्हते तर लग्नाला वीस लोकांची परवानगी असताना देखील 20 पेक्षा अधिक लोकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी चौकशी केली असता बकोरी येथील गाडुते आणि मरकळ येथील गोडसे यांचा शुभविवाह असल्याचे समजले. या लग्नसमारंभाला ईश्वर गाडुते( रा. बकोरी) यांनी शासकीय नियमानुसार परवानगी घेतली होती परंतु त्याच्याकडून दिलेल्या अटी व शर्तींचे कोणत्याही प्रकारे येथे पालन न करता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईश्वर गाडुते यांच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथीचे आजार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश व्यवहारे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बाळासाहेब गाडेकर करत आहे.