विशाळगड : बहुजननामा ऑनलाइन – राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त गड संवर्धन मोहिमेंतर्गत लोहगडाची स्वच्छता करण्याचे सकल मराठा समाज डिलाईल रोड, मुंबई यांच्या वतीने नुकतीच दुर्ग स्वच्छता व दुर्ग संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.पहाटे गडाच्या पायथ्याशी सकल मराठा समाज डिलाईल रोडचे सर्व कार्यकर्ते जमा झाले. लोहगडाच्या पायऱ्यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर मावळ्यांनी हातात खराटा, घेऊन पायऱ्यांवरील कचरा व इतरत्र पडलेला केरकचरा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला.
पायऱ्यांची स्वच्छता करतच मावळे लोहगडावर दाखल झाले आणि परिसरात पसरलेला केरकचरा, पालापाचोळा, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या आदी एका ठिकाणी गोळा करून जाळण्यात आल्या.जय शिवराय, जय जिजाऊचा नारा देत गड स्वच्छ करण्यात मावळे मग्न होते. बहुतांश केरकचरा, पालापाचोळा जमा करून तो नष्ट करण्यात आला. ओला-सुका कचऱ्याची मोहिमेदरम्यान साफसफाई करण्यात आली. अखेर किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावून गडाचे संवर्धन व जतन करण्याचे आवाहन पर्यटकांना करत मावळ्यांनी गड स्वच्छता मोहीम फत्ते केली.
या मोहिमेत संदीप खवरे, गणेश दाष्टे, सागर कुंभार, प्रतीक जाधव, विशाल मानकर, जयसिंग रवंदे, सूरज रवंदे, अवधूत पाटील, अनिल कोकीतकर, विनायक भोसले, अरविंद शिंदे, वसंत पाटील, वैभव जाधव, शशिकांत गायकवाड, शंकर करडे, सचिन बंडगर, सुरेश पाटील, भरत कळकुटे, सतीश दळवी, संतोष सेटके, सचिन बसरे, दिलीप शिंदे, अभिजित दाष्टे, कुलदीप चौत्रे, बाबू रिळेकर आदींनी सहभागी होऊन लोहगडाच्या स्वच्छतेसाठी विशेष परिश्रम घेतले.