नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – मराठा समन्वय मंचच्या वतीने राजमाता जिजाऊ जंयती व पानिपत शौर्य दिवसाचे औचित्य साधत श्री खंडोबा महाराज देवस्थानतर्फे पोलीस आणि सेवानिवृत्त लष्करी जवानांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला शिर्के होत्या. कॅप्टन दीपक लिमसे, पीएसआय नवनाथ पाटवदकर, नगरसेविका हर्षला साबळे तसेच अमरावती येथील आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षिका सविता शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमात १८ पोलीस व जवानांना सन्मानित करण्यात आले. तसेच समाजाकरिता अविरत कार्य करणारे जनार्दन जगताप आणि उत्तमराव सुळके यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. शांता बोटनिस, गोविंद निंबाळकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ पवार तसेच साक्षी व खुशी निघडे या विद्यार्थिनींचाही यावेळी सन्मान करण्यात आला. २५ विद्यार्थिनींना शालेय साहित्य भेट देण्यात आले. प्रास्ताविक मंचचे मुख्य समन्वयक सतीश गिरमकर यांनी केले. तर संचालन प्राची पिसाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रमेश नरवडे, दिलीप निघडे, नंदा गिरमकर, पूजा काटकर यांनी परिश्रम घेतले.