धुळे : बहुजननामा ऑनलाइन – जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिलांसाठी मानसशास्त्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेत समुपदेशन सुरेखा पाटील, प्रा. वैशाली पाटील यांनी केले. किरण नवले अध्यक्षस्थानी होत्या. स्त्रीयांचा मानसिक विकास व्हावा, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सुरेखा पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, घटना, विचार, वर्तन यावर त्यांनी प्रकाश टाकला.
जेव्हा आपण वर्तन करतो, तेव्हा घटना आणि वर्तन यामध्ये विचार असतो. आपण विचार कसे करतो, त्यावरच वर्तन अवलंबून असते. विवेकी विचार कशा पद्धतीने करायचा, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. वैशाली पाटील यांनी सकारात्मक विचार आणि गुरुत्वाकर्षण लहरी कशा काम करतात, आपल्याला दुसऱ्याच्या समस्या सोप्या का वाटतात, यावर मार्गदर्शन केले. सुखी राहण्यासाठी अहंकार कमी कसा करावा, स्वत: चा स्विकार करावा यावर त्यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांकडून त्यांनी विविध प्रयोग करून घेतले.
यात जिजाऊ ब्रिगेडच्या शारदा पाटील,अर्चना पाटील, यामिनी खैरनार, जयश्री पाटील ,शितल पाटील ,दिपाली पाटील ,डॉ. सुलभा कुवर ,आरस्तोल पाटील, उषा पाटील, वर्षा पाटील,भारती पाटील, रत्नाताई मोरे, मनिषा पवार, यात जयश्री पाटील यांनी सुत्रसंचालन केले. छाया पाटील यांनी आभार मानले.