नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने लोन मोरेटोरियम कालावधीच्या दरम्यान टर्म लोन्सवरील व्याजावर व्याज माफ करणे आणि लोन मोरेटोरियमच्या विस्ताराची मागणी करणार्या याचिकांवरील सुनावणी 14 डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. जस्टिस अशोक भूषण, आर सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांचा बेंच याप्रकरणात सुनावणी करत आहे.
यापूर्वी लोन मोरेटोरियम कालावधीच्या दरम्यान व्याजावर व्याजशी संबंधीत या प्रकरणावर सुनावणी मंगळवारी आणि त्या अगोदर 2 डिसेंबरला झाली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लाखो कर्जदारांचे लक्ष लागले आहे, ज्यांनी कोविड-19मुळे उत्पन्न प्रभावित झाल्याने लोन मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतला होता.
सुनावणी दरम्यानचे महत्वाचे मुद्दे
व्याजदरांमध्ये कपातीच्या ट्रांसमिशनवर सरकारने हे म्हटले…
फेब्रुवारी आणि ऑक्टोबर महिन्यादरम्यान आरबीआयने रेपो रेटमध्ये 1.15 टक्केची कपात ठरवली. यातून सरासरी कर्ज दरात 0.88 टक्केची घसरण आली. सोबतच ताज्या होम लोन्ससाठी व्याजदर 7 टक्केने खाली आले.
सरकारचा पावर गेनोस, डेव्हलपर्सला दिलासा देण्यास विरोध
बहुतांश याचिकाकर्ते असोसिएशन्सशी संबंधित आहेत. त्यांचे मुद्दे कोरोना महामारीचे कारण नाहीत, तर कोरोना अगोदरच्या फॅक्टर्सच्या कारणाने आहेत. या सेक्टर्समध्ये तणाव महामारीमुळे नाही. पावर सेक्टरसाठी जे करायचे होते, ते झाले. सरकारच्या मदतीबाबत बोलायचे तर कोरोना व्हायरस महामारी दरम्यानसुद्धा पावर प्लँट बंद नव्हते. लॉकडाऊनच्या दरम्यान एक दिवससुद्धा पावर प्लँट बंद झाले नव्हते.
केंद्राने व्याज माफीविरोधात सुप्रीम कोर्टाला सावध केले
जर सर्व प्रकारच्या कर्जावर व्याज सूट दिली गेली, तर माफ केलेली रक्कम 6 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त होईल. या कारणामुळे व्याजमाफीवर विचार करण्यात आला नाही. हे बँकांच्या शुद्धा मुल्याचा एक मोठा भाग समाप्त करेल आणि बँकांच्या अस्तित्वासाठी गंभीर प्रश्न निर्माण करेल. एकट्या एसबीआयबाबत बोलायचे तर व्याजमाफी बँकेच्या शुद्ध मुल्याचा अर्धा भाग संपवेल.
चक्रवाढ व्याजसुद्धा घेणार का? : सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टने म्हटले की, तुम्ही मोरेटोरियम कालावधीत दरम्यान व्याज घेतले आहे, परंतु तुम्ही चक्रवाढ व्याज सुद्धा घेणार का? हा प्रश्न आहे. यावर सॉलिसिटर जनरलने म्हटले की, हे बँक आणि जमकर्ता यांच्यामधील कराराचे प्रकरण आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, व्याजाचा भरणा आणि हप्तेसुद्धा कराराचे प्रकरण आहे, परंतु तुम्ही तिथेही तुमचे निर्णय लागू केले आहेत.