नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाने असिस्टंट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात निवड झालेल्या उमेदवारांची वेगवेगळ्या राज्यात नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अंतिम तारखेपूर्वी अर्ज करू शकतात.
पदाचे नाव- LIC Assistant
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही विषयात पदवीधर
महत्त्वाच्या तारखा-
अर्जप्रक्रिया होण्याची तारीख- 17 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 1 ऑक्टोबर 2019
प्राथमिक परीक्षेची तारीख- 21, 22 ऑक्टेबर 2019
प्रवेश पत्र देण्याची तारीख- 15 ऑक्टोबर 2019
अर्जाचे शुल्क- अनारक्षित आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 510 रुपये शुल्क तर एससी/एसटी आणि दिव्यांगांसाठी हे शुल्क 85 रुपये इतके आहे.
कशी होणार उमेदवाराची निवड ?
उमेदवारांची निवड प्राथमिक आणि मुख्य परीक्षेच्या आधारावर होणार आहे. प्राथमिक परीक्षेतील गुण आणि मुख्य परीक्षेतील गुण निवड प्रक्रियेत महत्त्वाचे असणार आहेत. मुख्य परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांचं मेडिकल चेकअप केलं जाणार आहे.
कसा कराल अर्ज ?
इच्छुक उमेदवार भारतीय जीवन विमा महामंडळाची अधिकृत वेबसाईट licindia.in वर लॉगइन करू शकतात.