बहुजननामा ऑनलाईन – पेटीएमच्या माजी कार्यकारी सोनिया धवन यांनी पुन्हा एकदा पेटीएम ज्वाइन केले आहे. सोनिया या कंपनीच्या गेमपॉईन्ट एंटरटेनमेंटसाठी काम करत होत्या. कंपनीचा डाटा चोरीचा आणि संस्थापक विजय शर्मा यांच्याकडून २० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप सोनिया यांच्यावर आहे. या प्रकरणामुळे त्यांना ५ महिने तुरुंगवास ही भोगावा लागला होता. गेमपॉईन्ट पेटीएमची मुख्य कंपनी वन ९७ कम्युनिकेशन आणि एजिटेक डोल्डिंग्स लिमिटेडचे जॉईंट वेंचर आहे.
सोनिया यांची तक्रार विजय यांच्या भावाने केली होती –
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोनिया धवन यांना या महिन्यात जमीन मंजूर केला आहे. सोनिया यांच्या विरोधात २२ ऑक्टोबरला पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शर्मा यांचे भाऊ अजय शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर सोनिया यांना ताब्यात घेण्यात आले होते. सोनिया याच्यावर पेटीएमच्या इतर कर्मचाऱ्यांसह डाटा चोरण्याचा आणि अजय शर्मा यांना २० कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा आरोप करण्यात आला होता.
कंपनीचे १४०० शेअर सोनिया यांच्याकडे होते –
नोव्हेंबर २०१७ साली सोनिया यांच्याकडे कंपनीचे १४०० शेअर होते. या शेअरची सध्याची किंमत ३. २ कोटी आहे. सोनिया या पेटीएम मधून वर्षाला ८५ लाख रुपये कमावत होत्या.
दर महिन्याला होतोय ३३० कोटी रुपयांचा तोटा –
रोज पेटीएमला ११ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. यामध्ये मागील वित्त वर्षात १६५ टक्के वाढ झाली आहे. हा तोटा १,४९० कोटी रुपयांनी वाढून ३,९५९. ६ कोटी रुपयांवर पोहचला. २०१८-१९ कंपनीचे उत्पन्न ३,३१९ कोटी रुपये होते, तर २०१७-१८ या वर्षात ३,२२९ कोटी रुपये एवढे कंपनीचे उत्पन्न होते.
सोनिया यांचे काय आहे म्हणणे –
या प्रकरणावर सोनिया धवन म्हणाल्या की, हे माझ्या विरुद्ध षडयंत्र होते. जे या लोकांनी रचले. तर पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार मागील दोन महिन्यापासून कंपनीच्या संस्थापकांना ब्लॅकमेल करत आहे. यांच्या नाराजीचे कारण केवळ एवढेच होते की, कंपनीने त्यांचे ४ कोटी रुपयांचे लोन देण्यास नकार दिला होता. परंतु याशिवाय अजून अनेक बाबी बाकी आहेत ज्या अजून पुढे येणे आहे.