हर्षवर्धन जाधव यांना लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे मदत केल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. ५० लाख रुपये पकडले होते ते कोणाचे होते, हे हर्षवर्धन यांनी सांगावं, असंही खैरे म्हणाले होते. दानवे यांनी निवडणुकीच्या काळात हर्षवर्धन यांना भरपूर पैसे पाठवले आहेत . याचा आढावा आह्मी घेतला आहे, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले होते.
यांवर हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंची चांगलीच खरडपट्टी केली आहे. खैरेंची बुद्धी भ्रष्ट झाल्याने ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. खैरे ज्या नेत्यांनी मदत केली असे सांगतात ते दानवे त्यांच्याच जवळचे आहेत. खैरेंना माझं आवाहन आहे की सासऱ्यांनी मला ५० लाख दिले हे सिध्द केले तर मी सांगेल ते करायला तयार आहे, असेही ते म्हणाले. मी रावसाहेब दानवे यांच्या जावयाच्या आधी रायभान जाधव यांचा मुलगा आहे. त्यामुळे ही निवडणूक मी स्वतःच्या जीवावर लढलो आहे, असेही जाधव यांनी सांगितले.