मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. EPFO च्या नियमित काही दिवसांपूर्वी बदल केल्याने तुम्ही आता ऑफलाईन पीएफ काढू शकत नाहीत. यासाठी एक अटही आहे. नोकरदारवर्गासाठी एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड काढणं सोप झालं आहे. आधी नोकरी बदलताना तुम्ही पीएफ ट्रान्सफर करायचे आता मात्र इपीएफओच्या रेकॉर्डप्रमाणे पीएफ काढण्यासाठी जास्त अर्ज आलेले दिसतात.
हे आहेत नवीन बदल
1) जर तुमचा आधार नंबर UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाऊंट नंबरला लिंक असेल तर तुम्ही PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंड ऑफलाईन काढू शकणार नाहीत.
2) नोकरदार वर्ग आता ऑनलाईन पीएफ काढू शकणार आहेत. रिजनल कमिशन एन के सिंह यांच्या मते फिल्ड ऑफिसमध्ये ऑफलाईन क्लेमची गर्दी वाढली आहे म्हणून इपीएफओनं हा निर्णय घेण्यात आला आहे.
3) याबाबत EPFOने एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे. त्यात म्हटलं आहे की, पीएफ सदस्य फॉर्म भरून क्लेम करत आहेत. यामुळे ऑफिसवरील लोड वाढत आहे.
4) ऑफिसवरील वाढता लोड बघता पीएफ मिळण्यास उशीर होत असे. म्हणूनच आता ऑफलाईन क्लेम स्विकारले जाणार नाहीत. यामुळे आता कंपन्यांनाही ऑनलाईनचा वापर करा असा सल्ला दिला गेला आहे.
5) काही लोक ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे क्लेम करु शकतात. EPFO ने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात असंही म्हटलं आहे की, जर असे कोणी केले तर फक्त ऑनलाईन क्लेमच स्विकरला जाणार आहे.
6) कसा कराल ऑनलाईन क्लेम ?
ऑनलाईन क्लेम करण्यासाठी http://www.epfindia.com/site_en/ या साईटवर तु्म्हाला जावे लागणार आहे. येथे तुम्हाला ऑनलाईन क्लेमचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ही लिंक ओपन होईल.
7) वरील लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला युएएन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. अशा प्रकारे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिटचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्हाला विथड्रॉअल फॉर्म कंपनीत द्यावा लागणार आहे.
8) जेव्हा तुम्ही ऑनलाईन क्लेम कराल त्यानंतर फिल्ड ऑफिसर त्या क्लेमला व्हेरीफाय करेल. परंतु यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे युनिफाईड पोर्टलवर केवायसी पूर्ण करणे.