नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर (Lavni Samradni Surekha Punekar) यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सध्या राजकारणात कोरोनाच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस टीकेची झोड उठवत आहेत. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. यात आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Lavni Samradni Surekha Punekar) यांनी विधानसभा निवडणुकीची तिकीट मिळण्यासाठी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्याकडे मागणी केलीय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लावणी सम्राज्ञी सुरेख पुणेकर आज (मंगळवारी) नांदेडमध्ये (Nanded) बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. सुरेखा पुणेकर या आता राजकारणात उतरू लागल्या आहेत. त्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघातून (Deglaur-Biloli Assembly constituency) निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यामुळे पुणेकर यांनी तिकिटाबाबत मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, देगलूर मतदारसंघातील आमदार रावसाहेब आंतापूरकर (MLA Raosaheb Antapurkar) यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यातच सुरेखा पुणेकर देखील त्या यादीत सामील झाल्या आहेत.
दरम्यान, सुरेखा पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या निवडणुकीमध्ये अधिकच चर्चा रंगल्या आहेत. असे सुरेखा पुणेकर यांचे चाहते सांगतात. यापूर्वी पुणेकर यांनी राष्ट्रवादीकडून (NCP) तिकीट मिळावी यासाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यात काही निष्पन्न झालं नाही. त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
Web Title : yashpal sharma dies of heart attack former cricketer 1983 world cup
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 344 रुग्णांना डिस्चार्ज