नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपन्यामध्ये १४ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील तेलाची किंमत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत २९ पैसे आणि डिझेलच्या किंमतीत १९ पैशांनी वाढ झाली आहे. रविवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल २७ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी प्रतिलिटर महागले आहे. या ७ दिवसात दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १. ८८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरात प्रति लिटर १.५० रुपयांची वाढ झाली आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे ७३.९१ रुपये, ७९. ५७ रुपये,७६.६० रुपये आणि ७६.८३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. चार महानगरांमधील डिझेलचे दरही अनुक्रमे ६६.९३ रुपये, ७०.२० रुपये , ६९.३५ आणि ७०.७६ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत लागू होईल. त्यांच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन जोडल्यानंतर त्याचे मूल्य जवळपास दुप्पट होते.
आपण दररोज आपल्या शहराची किंमत तपासू शकता. एसएमएसच्या माध्यमातून ग्राहक विशिष्ट नोंदणीकृत क्रमांकावर एसएमएस पाठवून किंमती तपासू शकतात आणि त्यांना सध्याच्या किंमतीबद्दल संदेशाद्वारे माहिती दिली जाईल. इंडियन ऑइल ग्राहक आरएसपी <डीलर कोड> ९२२४९९२२४९ पाठवू शकतात. बीपीसीएल ग्राहकांना आरएसपी <डीलर कोड> ९२२३११२२२२ वर पाठवावे लागेल. एचपीसीएल ग्राहकांना एचपीपीआरआयएस <विक्रेता कोड> ९२२२२०११२२ पाठवावे लागेल.
Visit : bahujannama.com