नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या प्राणघातक विषाणूमुळे कच्च्या तेलाची मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूडचे दर सातत्याने खाली येत आहेत. परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर होत आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा खाली आले आहेत. शनिवारी २५ जानेवारी रोजी पेट्रोल एक लिटर मागे २७ पैशांनी कमी करून ७४.१६ रु. प्रति लिटर तर डिझेल ३० पैशांनी स्वस्त होऊन ६७.३१ रु. प्रति लिटर झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात पेट्रोलची कमाल किंमत ७६.०१ रुपयांवरून आता पेट्रोल १.८५ रु. प्रति स्वस्त झाले आहे.
१२ जानेवारीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सतत घट होत आहे. मागील १४ दिवसात पेट्रोल १.८५ रुपयांनी आणि डिझेल १.८६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ६०.६२ रुपयांवर आले आहे. भारताप्रमाणे चीननेदेखील आपले ९० टक्के कच्चे तेल विदेशातील बाजारातून खरेदी करते. आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये चीनने ५०६ दशलक्ष टन कच्चे तेल विकत घेतले आहे.
सध्याच्या विषाणूमुळे चीनमध्ये मागणी कमी होऊ शकते, असे गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार समोर आले आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेल प्रति बॅरल ३ डॉलर्स स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. जानेवारीमध्ये ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ७० डॉलरवरून ६० डॉलरवर आली आहे. त्यानुसार १ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत कच्चे तेल १२ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.
Visit : bahujannama.com