नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि चांगल्या पॉलिसी देण्यासाठी अनेक आकर्षक प्लान सुरू केले आहेत. यापैकी एक आहे एलआयसीची न्यू जीवन आनंद पॉलिसी 815. या पॉलिसीमध्ये ग्राहकांना दुप्पट फायदा मिळत आहे. या पॉलिसीचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
या पॉलिसीच्या गुंतवणूकीत इन्कम टॅक्स वाचतो. दुसरा फायदा म्हणजे रिस्क कव्हर पॉलिसी कालवधीनंतरही सुरू राहते. एलआयसीचे प्लान बंद झाल्यानंतर नव्या पॉलिसीवर रिटर्न कमी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नव्या पॉलिसीचा प्रीमियम वाढू शकतो. यासाठी एजन्ट ग्राहकांना 31 जानेवारीपूर्वी या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. जर पॉलिसी धारकाचा मृत्यु, पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर झाला तरी सुद्धा निधनानंतरचे लाभ मिळतात.
न्यू जीवन आनंद पॉलिसीबाबत…
कोण घेऊ शकतात ही पॉलिसी
न्यू जीवन आनंद पॉलिसी 18 ते 50 वर्ष वयातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. या पॉलिसीसाठी किमान वय 18 आहे. पॉलिसीचा कालावधी 15 ते 35 वर्षांचा आहे. न्यू जीवन आनंद पॉलिसी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन खरेदी करू शकता.
प्रीमियम कसा भरू शकता
पॉलिसीसाठी वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक आधारावर प्रीमियम भरता येतो. विशेष बाब म्हणजे ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर 3 वर्षानंतर तिच्यावर कर्ज घेता येते.
असा मिळेल पॉलिसीचा लाभ
एखादा पॉलिसी धारक 18 व्या वर्षी ही पॉलिसी खरेदी करत असेल अणि 1 लाख सम अॅश्यूर्डसाठी 35 वर्षांचा प्लान घेत असेल तर त्याचा वार्षिक प्रीमियम 1,07,645 रुपये असेल. त्यास ही रक्कम 35 हप्त्यात भरावी लागेल. मॅच्युरिटीनंतर पॉलिसी धारकाला 4.56 लाख रुपये मिळतील.
मिनिमम सम अॅश्यूर्ड
या पॉलिसी अंतर्गत कमीत कमी 1 लाख रुपयांचे सम एश्यूर्ड घेणे जरूरी आहे. याची कमाल मर्यादा नाही.
मॅच्युरिटीनंतर मिळेल एवढा लाभ
सम अॅश्युर्डसह सिंपल रिव्हर्सनरी बोनस आणि फायनल अॅडिशनल बोनस.
पॉलिसीदरम्यान मृत्यू झाल्यास
पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला जी वीमा रक्कम दिली जाईल ती वीमा रक्कमेच्या 125 टक्के असेल. यासह बोनस आणि अंतिम बोनस सुद्धा मिळतो.
टॅक्समध्ये फायदा
इन्कम टॅक्स नियम कलम 80सी अंतर्गत प्रीमियम भरल्यानंतर टॅक्स सवलत मिळते.
Visit : bahujannama.com