जहानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – देशात सात टप्प्यात निवडणूका होणार असून अजून तीन टप्पातील मतदान बाकी आहे आणि या टप्प्यात उत्तरप्रदेश ,बिहार ,पश्चिमबंगाल असे महत्वाचे राज्य अजून बाकी आहेत. असताना राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजप्रताप यादव हे त्यांचे बंधू तेजस्वी यादव यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी मी लालू प्रसाद यादवांचे रक्त आहे. मी खरा वारीस असून असून बिहारचा दुसरा लालू यादव आहे, असा दावा तेजप्रताप यादव यांनी केला आहे. जहानाबादमध्ये त्यांचे उमेदवार चंद्रप्रकाश यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना तेजप्रताप यादव म्हणाले, लालू यादव खूप उत्साही व्यक्ती होते. ते एका दिवसात १० ते १२ प्रचारसभा घेत होते. परंतु, काही नेते (तेजस्वी यादव) दोन सभा घेऊन लगेच थकून जातात. काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांनी प्रकृती अस्वास्थामुळे अनेक सभा रद्द केल्या होत्या. त्यामुळे तेजप्रताप यादव यांनी तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, मी लालू यादव यांचे रक्त आहे. लालू आमचे आदर्श गुरु आहेत. मी बिहारचा दुसरा लालू यादव आहे, असा दावाही तेजप्रताप यांनी केला.