पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भारतातील विद्यापीठांमध्ये सहाव्या क्रमांकांवर असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जगभरातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर करण्यात असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आशिया खंडात १०९ वा क्रमांक पटकाविला आहे. जागतिकस्तरावर ते ५०१ ते ६०० या गटात ते समाविष्ट झाले आहे.
याशिवाय नव्याने विकसित होत देशांमध्ये (एमर्जिंग इकॉनॉमिज) विद्यापीठाने ९३ वा क्रमांक पटकावला आहे.टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग संस्थेकडून जगभरातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर करण्यात आली आहेत .
या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (बंगळुरू), दुसऱ्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंदूर), तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (रूरकी) आणि जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च (मैसूर) या संस्था आहेत. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी (दिल्ली), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कानपूर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) या संस्थांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे.
आशिया खंडातील रँकिंगमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुणे विद्यापीठाने १८८ व्या स्थानावरून सुधारणा करत १०९ व्या स्थानावर ते पोहचले आहे.