मुजफ्फरपुर : वृत्तसंस्था – बिहारच्या मुजफ्फरपुरमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका सरकारी हॉस्पीटलमध्ये नसबंदी केल्यानंतर दोन वर्षानंतर एक महिला गरोदर राहिल्याचे प्रकरण समोर आले आहे. ज्यावर महिलेने जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार केली आहे. तर, सरकारकडे 11 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. प्रकरण मुजफ्फरपुरच्या मोतीपुर प्राथमिक केंद्राशी संबंधीत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 27 जुलै 2019 मध्ये नसबंदी करणारी महिला फुलकुमारी देवी पुन्हा गरोदर राहिली.
महिलेने सांगितले की, जेव्हा मी मोतीपुर पीएचसीमध्ये जाऊन गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा माझे अल्ट्रासाऊंड करण्यात आले. रिपोर्टमध्ये फुलकुमारी गरोदर असल्याचे आढळले. महिलेची अगोदरच चार मुले आहेत. ज्यानंतर तिने नसबंदी केली होती, तिला पाचवे मुल नको होते. पुन्हा गरोदर झाल्यानंतर महिलेने या प्रकरणी मुजफ्फरपुर ग्राहक आयोगात आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली. तर, सरकारकडून 11 लाख नुकसान भरपाईची मागणी केली आहे. महिला या मुलाच्या पालन-पोषणासाठी अजिबात तयार नाही.
मुलाच्या पालन-पोषणासाठी मागितले 11 लाख
फुलकुमारीने आपल्या पाचव्या मुलाच्या पालन-पोषणासाठी सरकारकडून 11 लाख रुपये भरपाई मागितली आहे. या प्रकरणी फुलकुमारीचे वकील डॉ. एस. के. झा यांनी म्हटले की, हे गंभीर प्रकरण आहे, ज्यासाठी आरोग्य विभागाचे सर्वोच्च अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. प्रकरणात मुख्य सचिवांशिवाय आरोग्य सचिव, कुटुंब नियोजनचे उप संचालक आणि मोतीपुर पीएचसीचे प्रभारी डॉक्टर यांना पक्षकार बनवण्यात आले आहे.
प्रकरणाची सुनावणी 16 मार्चला
जिल्हा ग्राहक आयोगाने सुद्धा महिलेच्या तक्रारीची दखल घेत प्रकरणाची सुनावणी 16 मार्चला ठेवली आहे. राज्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारकडून नसबंदी करणार्या महिलांना प्रोत्साहन रक्कम सुद्धा दिली जाते.