पोस्ट ऑफिसची ही योजना किसान विकास पत्र (kisan vikas patra scheme) बचत योजना आहे. त्यावर आता 6.9% व्याज मिळत आहे. हा व्याजदर देशातील अनेक बँकांच्या FD वर उपलब्ध असलेल्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. देशातील अनेक मोठ्या बँका एफडीवर 5 ते 6 टक्के व्याज देत आहेत.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
– हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असते जे बॉण्डप्रमाणे दिले जाते.
– त्यावर ठराविक दराने व्याज मिळते.
– सध्या यावर 9 टक्के व्याज दिले जात आहे.
– हे देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करता येते.
किती गुंतवणूक करू शकता
– KVP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही.
– किमान गुंतवणूक रु 1000 असावी.
– 100 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतविली जाऊ शकते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अकाऊंट होऊ शकते ट्रान्सफर
– या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक व्यक्ती योजनेचे प्रमाणपत्र दुसर्या व्यक्तीकडे हस्तांतरित करू शकते.
– एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट ट्रान्सफर देखील करता येते.
एकल आणि संयुक्त खाते सुविधा
– या योजनेअंतर्गत एकल किंवा संयुक्त खाते उघडता येते.
– खाते उघडणार्याचे वय किमान 18 वर्षे असावे.
– अल्पवयीन व्यक्तीदेखील खाते उघडू शकते, परंतु याची देखरेख पालकांना करावी लागेल.
लॉकिंग कालावधी
– योजनेचा लॉक-इन कालावधी अडीच वर्षांचा आहे.
– याचा अर्थ तुम्ही अडीच वर्षे पैसे काढू शकत नाही.
किती कालावधी पैसे होतात दुप्पट?
सध्याच्या 9 टक्के वार्षिक व्याजदरानुसार, पैसे सुमारे 10 वर्षे 4 महिन्यांत (124 महिने) दुप्पट होतील.
Web Title :- KVP | in kisan vikas patra scheme your money will be doubled in so many months know the details
Cyber Crime | सावधान ! ओमिक्रॉनच्या नावाखाली होतेय फसवणूक, गृह मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी
New GST Rules | GST नियमांची काळजी घ्या ! आजपासून नवे बदल लागू
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी