बहुजननामा ऑनलाइन टीम – शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्या चे कर्तव्यावर असताना सोमवारी (दि. 1) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. या घटनेमुळे पोलीस दलातील काम आणि त्यातील तणाव याबाबत पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विजय घाटगे (वय 38) असे निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. घाटगे यांना पोलीस उपअधीक्षक कार्यालयात असताना छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांना कोंडा ओळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे आई -वडील, पत्नी, मुलगा असा परिवार असल्याचे त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितले. घाटगे मूळचे हातकणंगले तालुक्यातील असून सध्या ते राजोपाध्ये नगर परिसरात राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शहर परिसरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात गर्दी केली होती
घाटगे 2008 पोलीस दलात भरती झाले होते. राजारामपुरी, शाहूपुरी पोलीस ठाणे नंतर त्यांना शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयात गुन्ह्यांची उकल करण्यासाठी खास नियुक्ती केली होती. प्रामाणिक, हुशार आणि तपासात दर्जेदार काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून पोलिस दलात प्रसिद्ध होते.