• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kirit Somaiya in PMC | किरीट सोमय्या यांच्या ‘पायर्‍यांवरील’ सत्कारावेळी महापालिका भवनला पोलिस छावणीचे स्वरुप; सर्वसामान्य नागरिकांना व कर्मचार्‍यांनाही महापालिकेत प्रवेश बंदी केल्याने दिवसभर काम ठप्प (व्हिडीओ)

by nageshsuryavanshi
February 11, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, राजकीय
0
Kirit Somaiya in PMC | Pune Mahapalika Bhavan Pune Police BJP Kirit Somaiya Pune Corporation PMC

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Kirit Somaiya in PMC | शिवसैनिकांनी (Shivsainik) किरीट सोमय्या यांना महापालिका भवनच्या (Pune Mahapalika Bhavan) पायर्‍यांवर केलेल्या धक्काबुक्कीला प्रत्युत्तर म्हणून आज शहर भाजपने (BJP) त्याच पायर्‍यांवर सोमय्या यांचा सत्कार करण्याच्या कार्यक्रमामुळे महापालिकेमध्ये (Pune Corporation) चांगलाच राडा झाला. सकाळपासूनच पोलिसांनी महापालिकेला छावणीचे स्वरूप दिल्याने सर्वसामान्य नागरिकच काय पण अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही महापालिकेत प्रवेश करता आला नाही. साडेचार वाजण्याच्या सुमारास महापालिकेत आलेल्या सोमय्या यांना भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीतून आत नेताना चांगलीच ओढाताण झाली. महापालिका भवनच नव्हे तर शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ताही काही तास बंद करण्यात आल्याने वाहतुकीचा फज्जा उडाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. (Kirit Somaiya in PMC)

कोरोना काळात पीएमआरडीएने (PMRDA) उभारलेल्या जंबो हॉस्पीटलच्या (PMC Jumbo Hospital) कामात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राउत (Sanjay Raut) हेच सूत्रधार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी मागील शनिवारी महापलिकेत आलेल्या सोमय्या यांना शिवसैनिकांसोबत झालेल्या गोंधळात सोमय्या पायर्‍यांवर पडले व त्यांना दुखापत झाली. विशेष असे की ही घटना घडली तेंव्हा भाजपचा पालिकेतील अथवा पक्षाचा एकही पदाधिकारी नव्हता. या घटनेची गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांनी दखल घेतली. भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी आज पुणे दौर्‍यावर आलेल्या सोमय्या यांचा ते ज्या पायरीवर पडले त्याच पायरीवर सत्काराचे आयोजन केले होते. (Kirit Somaiya in PMC)

पुन्हा कुठल्याही प्रकारचा गोंधळ होउ नये म्हणून पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी संपुर्ण महापालिका भवनचा अक्षरश: ताबा घेतल्याने छावणीचे स्वरूप आले होते. पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने कामे करून घेण्यासाठी आलेल्या शहराच्या सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांनी महापालिका भवनमध्ये प्रवेशच दिला नाही. महापालिकेच्या तिनही प्रवेशद्वारांवर ओळखपत्र पाहूनच अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रवेश देण्यात आला.

दुपारी साडेतीन वाजता सोमय्या महापालिकेमध्ये येणार असल्याने दुपारी दोन वाजल्यानंतर अगदी बाहेर असलेल्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनाही प्रवेश दिला गेला नाही. साडेचारच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात सोमय्या यांचा ताफा पालिकेत आला. परंतू मिनिटभर थांबून तो ताफा तसाच बाहेर पडला. महापालिका भवन बाहेर व लगतच असलेल्या भाजप कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर जमले होते. त्यामुळे टिळक पुलावरून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येणारा मार्ग तसेच शिवाजी रस्ता बॅरीकेड लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

काही वेळातच सोमय्या, शहर प्रमुख जगदीश मुळीक यांच्यासह शेकडो महिला, युवा कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत मुख्य प्रवेशद्वारावर थकडले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्यानंतर जोषात असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करतच प्रवेशद्वार ढकलत सोमय्या यांच्या सुरक्षा पथकासह आतमध्ये प्रवेश केला. कार्यकर्ते इतके बेभान झाले होते की सोमय्या यांना गर्दीतून वाचविण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी अक्षरश: त्यांना बकोटीला पकडूनच आतमध्ये नेले. महापालिकेच्या पायर्‍यांवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांने ‘ एकच भाई, किरीट भाई’ अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), खासदार गिरीष बापट (MP Girish Bapat), स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne), सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमय्या आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेउन आल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर थोडक्यात मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सोमय्या यांचा पुष्पगुच्छ व शाल देउन सत्कार केला.

कोरोना काळात उभारण्यात आलेल्या जंबो कोव्हिड हॉस्पीटलच्या कामांत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. राज्य शासनाने हे काम त्यांच्या निकटवर्तीयांना दिले होते. या भ्रष्टाचारामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राउत आहेत. मागील आठवड्यात माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. परंतू गुन्ह्याच्या तुलनेत कमी कलमे लावली. पोलिस राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे तक्रार देण्यासाठी मी पुण्यात आलो आहे. महाविकास आघाडी सरकारने माझ्यावर कितीही हल्ले केले तरी मी सत्य उजेडात आणणार.

– किरीट सोमय्या, भाजप नेते.

 

Web Title :- Kirit Somaiya in PMC | Pune Mahapalika Bhavan Pune Police BJP Kirit Somaiya Pune Corporation PMC

 

Aurangabad News | काय सागंताय ! होय, चक्क भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा

Indian Railways | 8 सेवा एकत्रित करून केली एक, अस्तित्वात आले IRMS, नोटिफिकेशन जारी

Weight Loss | रात्री ‘हे’ काम करून सुद्धा कमी करू शकता वजन, आहे खुप सोपे

Tags: BJPCorruptionGanesh BidkarHemant RasneJagdish MulikKirit SomaiyaKirit Somaiya in PMCKirit Somaiya in PMC latest news todayKirit Somaiya in PMC marathi newsKirit Somaiya in PMC newsKirit Somaiya in PMC today marathilatest Kirit Somaiya in PMClatest news Kirit Somaiya in PMC latest marathi newsmarathi in Kirit Somaiya in PMCMayor Muralidhar MohoMP Girish BapatPMC Jumbo HospitalPMRDApune corporationPune Mahapalika BhavanSanjay Rauttoday's Kirit Somaiya in PMC newsकिरीट सोमय्याखासदार गिरीष बापटगणेश बिडकरजंबो हॉस्पीटलजगदीश मुळीकपीएमआरडीएभाजपभ्रष्टाचारमहापालिका भवनमहापौर मुरलीधर मोहोळसंजय राउतहेमंत रासने
Previous Post

Aurangabad News | काय सागंताय ! होय, चक्क भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा

Next Post

Multibagger Stocks | 10 हजारांचे झाले 36 लाख; दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टाॅकने करून दिली कमाई, जाणून घ्या

Next Post
Multibagger Stocks | 10 thousand became 36 lakhs shares worth less than rs 2 now above 500 investors got lakhs and crores

Multibagger Stocks | 10 हजारांचे झाले 36 लाख; दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टाॅकने करून दिली कमाई, जाणून घ्या

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

BP Control Tips 3 habits that can increase blood pressure skip it immediately
आरोग्य

BP Control Tips | खाण्या-पिण्यासंबंधीच्या ‘या’ 3 सवयी वाढवू शकतात ‘ब्लड प्रेशर’, जाणून घ्या कोणत्या

March 17, 2022
0

...

Read more

Eknath Shinde | ‘माझ्यासोबत 50 आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’ – एकनाथ शिंदे

6 days ago

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

3 days ago

Eknath Shinde | ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करायला सांगा – एकनाथ शिंदे गट

3 days ago

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचं मोठं विधान

2 days ago

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’

6 days ago

Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते’ – मोहन भागवत

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat