समीर मलिक (Sameer Malik) असं करोडपती भंगारवाल्याचं नाव आहे. तो औरंगाबादचा आहे. समीरला अटक (Arrested) केल्यानंतर याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानं दिल्ली सरकारला तब्बल 200 कोटींचा गंडा (200 Crores) घातला आहे. जीएसटी इनपूट क्रेडिटच्या (GST Input Credit) माध्यमातून त्यानं ही फसवणूक (Fraud) केली आहे. हा भंगार विक्रेता भंगाराची विक्री न करता बनावट बिलं तयार करत होता. (Aurangabad News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
समीर मलिकने औरंगाबादमधील 15 भंगार व्यावसायिकांकडे बनावट बिलाच्या आधारे व्यवहार केला आहे. बोगस कंपनीच्या नावावरून त्यानं कोट्यवधींची बोगस बिले बनवली आहेत. त्यामधून सुमारे 10 कोटींची बिलं औरंगाबादच्या एकाच व्यापाऱ्याला पाठवली. पण, अशी बिलं तब्बल शहरातल्या 15 व्यावसायिकांना पाठवण्यात समोर आलीय.
दरम्यान, करोडपती भंगारवाल्याच्या या कारनाम्यानं औरंगाबादसह देशभरातील भंगार व्यावसायिक (Scrap Commercial) चौकशीच्या रडारवर आले आहेत. आता या प्रकरणात औरंगाबादमधील 15 भंगार विक्रेते जीएसटी विभागाच्या (GST Department) रडारवर आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती परराज्यात देखील असल्याचं म्हटलं जात आहे.
Web Title :- Aurangabad News | bhangarwala cheted rs 200 crore Delhi government by making fake bills through gst input tax credit
BJP MLA Suspension Revoked | अखेर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे, राज्य सरकारचा निर्णय
Indian Railways | 8 सेवा एकत्रित करून केली एक, अस्तित्वात आले IRMS, नोटिफिकेशन जारी
Pune Metro | महामेट्रोकडून 82.5 किलोमीटर लांबीचे नवीन 7 मार्ग प्रस्तावित