बहुजननामा ऑनलाईन – एक खास इलेक्ट्रिक स्कूटर सध्या ह्युंदाई कंपनी घेऊन आली आहे. ह्युंदाईची ही स्कूटर इतर स्कूटरच्या तुलनेत जरा हटकेच आहे. २०१७ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ह्युंदाईने प्रदर्शनात आणली होती. कर खरेदी करणाऱ्यांना सवलत देण्याच्या उद्देशाने ही स्कूटर लॉन्च करण्यात आली होती. या खास इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये फ्रंट आणि रियर लाइट्स लिथियम आयन बॅटरी देण्यात आली असून व्हील ड्राईव्ह सुविधांनीही ती सुसज्ज आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, भविष्यात किओ मोटर्स आणि ह्युंदाई गाड्यांबरोबरच ही मिळणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा उपयोग कार लांब पार्किंग केल्यास तिथपर्यंत जाण्यासाठी होणार आहे. स्कूटर फिट करण्यासाठी कार मध्ये एक स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. ज्यात इलेक्ट्रिक स्कूटर सहजगत्या ठेवता येऊ शकते इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ह्युंदाईने १०. ५ लिथियम आयन बॅटरी दिली आहे. एकदा ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर २० किलोमीटर प्रतितास प्रमाणे चालणार आहे.
सर्वात जास्त आकर्षण या स्कूटरचे हे असणार आहे की वाहन चालवत असताना बॅटरीतून निर्माण होणाऱ्या विजेवर ही स्कूटर आपोआप चार्ज होणार आहे. इंटिग्रेटेड इलेक्ट्रिक स्कूटर चे वजन ७.७ किलोग्रॅम आहे. तीन ठिकाणी या स्कूटरला आपण दुमडू शकतो वजन कमी असण्याबरोबरच तिला तीन भागात दुमडूण्यात आल्याने ती हातातून घेणेही शक्य असणार आहे.
स्कूटरचे फीचर्स
डिजिटल डिस्प्ले इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आले आहे आणि बॅटरी सह इतर माहिती मिळणार आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून स्कूटरने वाहतूक करता यावी यासाठी गरजेपुरती एलईडी हेडलाईट आणि दोन टेललाइट देण्यात आले आहेत. तसेच ह्युंदाईनं यात रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमचाही अंतर्भाव केला आहे. त्यामुळे स्कूटरचा वेग 7 टक्क्यांनी वाढणार आहे.